मी बाप झालो । Mi baap zalo Poem - I became a Father - Sangat Shabdanchi Poem

"MI Bap Zalo" Kavita

मी बाप झालो

नमस्कार मित्रांनो,
आज 25/04/2020 रोजी मला मुलगा झाला, मी बाप झालो।

खरं सांगायचं म्हणजे आपल्याला मुलगा झाला किंवा मुलगी झाली म्हणजे आपण बाप होत नाही तर आपल्या जीवणातून जेव्हा आपले वडील निघून जातात, जेव्हा आपल्याला त्यांच्या जाण्याची उणीव भासते, आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते, आपल्यावर जेव्हा वडिल bap या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या येतात आणि जेव्हा आपण एक कुटुंब Family प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करू लागतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बाप बनतो.
 
पण तरीसुद्धा मला मुलगा झाला या माझ्या भावना मी या कवितेतून तुमच्या पर्यंत पोहचवत आहे।
या फक्त माझ्या एकट्याच्या भावना नाहीयेत, तर जगातील प्रत्येक बापाच्या भावना आहेत.
आपण मुलं ना आपल्याला बापाची पूर्ण जाणीव नसते, कारण आपण बाप नसतो ना! जेव्हा आपण बाप बनतो तेव्हा जो अनुभव आपल्याला येतो, तो अवर्णनीय असतो।
म्हणतात ना "जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे" म्हणजे जर आपल्याला एखाद्याला जाणून घायचं असेल तर आपल्याला त्याच्या जागेवर किंवा त्याच्या ठिकाणी जावं लागतं म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर आपण स्वतः जेव्हा आई किंवा वडील बनतो तेव्हा आपल्याला आपल्या आई Aai Vadil वडिलांची अजून जास्त किंमत कळते।
चला तर मग एक मुलगा जो आजवर एक साधारण मुलगा होता पण त्या मुलाला जेव्हा एक गोंडस, साजूक, निरागस बाळ होतं म्हणजे जेव्हा तो बाप बनतो तेव्हा त्याच्या काय Feelings असतात ते जाणून घेऊया एका कवितेतून।

मी बाप झालो । Mi Baap Zalo

बापाच्या काळजाचा,

अनुभव घेऊन आलो,
खूप आनंद होत आहे,
आज मी बाप झालो...।।१।।

आजवर होतो मुलगा,
नव्हती जाणीव बापाची,
आज कळाले काय असती,
स्थिती एका पित्याची...।।२।।

बापाला समजण्यासाठी,
आधी बाप व्हावे लागते,
तेव्हा कुठे आपल्याला,
बापाची किंमत कळते...।।३।।

त्या छोट्याश्या बाळाची,
मोठी काळजी करू लागलो,
खूप आनंद होत आहे,
आज मी बाप झालो...।।४।।

कळत नाही आज मला,
कसं व्यक्त व्हावं,
एका बापाला कसं,
काही शब्दांमध्ये मांडाव...।।५।।

का कुणास ठाऊक,
थोडंस वेड्यासारखं करू लागलो,
पण खूप आनंद होत आहे,
आज मी बाप झालो...।।६।।


खरं आहे की नाही?
तुमच्या भावना तुम्ही खाली कमेंट मध्ये लिहा, सगळ्यांना कळू द्या...🙏

◆माझ्या मुलाच्या जन्मतारखेचा आणि भारतातील सणा वारांचा दुर्मिळ योगायोग:

●25/01/2020: राष्ट्रीय मतदाता दिवस National voter day.
●25/02/2020:
●25/03/2020: मराठी नवीन वर्षाची सुरवात गुढीपाडवा Gudhipadwa.
●25/04/2020 (जन्मदिवस Birth Day): अक्षय तृतीया च्या अगोदरचा दिवस म्हणजे विठ्ठल रखुमाई Vitthal Raukhmai चा वाढदिवस. या दिवशी अन्नदान करण्यासाठी संपूर्ण गावाला प्रसाद म्हणून भंडारा असतो.
●25/05/2020: इस्लाम धर्मातील रमजानच्या पवित्र महिन्यातील पवित्र रमजान ईद Ramjan Eid.
●25/06/2020:
●25/07/2020: हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी Nagpanchami.
●25/08/2020: गणेशोत्सव आणि विशेष म्हणजे माता गौरी/लक्ष्मी चे आगमन Laxmi/Gauri Pujan
●25/09/2020:
●25/10/2020: एक विशेष सण विजयादशमी दसरा Vijyadashmi Dasara.
●25/11/2020:
●25/12/2020: सगळ्या जगाचा लोकप्रिय सण ख्रिसमस नाताळ Merry Christmas.

आहे की नाही योगायोग?

या वरील कवितेवर तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये लिहून कळवा. जर तुम्हाला वाटत असेल की मी अजून काही एखाद्या इतर विषयावर लिहावे तर कृपया मला कळवा, मी त्या विषयावर माझे मत मांडण्याचा नक्की प्रयत्न करीन.
--------------------------------------------------------------
संगत शब्दांची या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी आणि नवनवीन साहित्य वाचन व व्हिडिओ साठी आत्ताच Follow/Subscribe करा:-
©SangatShabdanchi (संगत शब्दांची) 2022

टिप्पण्या

  1. खूप छान रचना केली आहे कविवर्य आणि बाप या दोन शब्दांची व्याप्ती आणि बाप या शब्दात किती कर्तव्य पार पाडावे लागतात ही रचना खुप च अप्रतिम आहे बाप आणि कर्तव्य यांची कवितेच्या माध्यमातून मांडली त्याबद्दल अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  2. जगातील प्रत्येक सजीवाला आपला वंश वाढावा असं वाटत असतं.त्याच्यासाठी प्रत्येक सजीवाची धडपड सुरू असते. तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.आज तुम्ही पितृ ऋणातून मुक्त झाला आहात.तुमचे,बाळाच्या आईचे व बाळाचे खूप अभिनंदन.💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा