02/12/2023 l नित्य स्वामी दर्शन l गुरू स्वामी समर्थ l Shree Guru swami samarth l Nitya swami darshan 02 Decembar 2023

02/12/2023 नित्य स्वामी दर्शन (गुरू स्वामी समर्थ)

🌹 श्री गुरुदेव दत्त | श्री गुरू स्वामी समर्थ 🌹

नवविधाभक्तीमधली तिसरी भक्तिपायरी आहे विष्णुस्मरणाची, म्हणजेच नामस्मरणाची. खरे तर आजपर्यंत मी तुमच्याशी स्वामी समर्थांच्या नामस्मरणासंबंधी खूप विस्ताराने अनेक वेळेला सांगितले आहे. स्वामींच्या नामगायनाला खरोखर सांगतो, पर्यायच नाही. तुम्हाला मी सांगतो की सर्वच श्रोत्यांना, स्वामीभक्तांना पावन करून त्यांचा निश्चित उद्धार करणारे कीर्तन आणि भजन जसे स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे तसेच नाम घेणे स्वामींना प्रिय आहे. स्वामींचे अखंड नामस्मरण सर्वच स्वामीभक्तांना स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडवते.

म्हणून स्वामींचे नित्य स्मरण करावे. त्यांच्या नामाचा | जप करावा. त्याला काळाचे बंधन नाही. तुम्ही कुठल्या मानसिक अवस्थेत आहात ह्याचे बंधन नाही. म्हणजे काय तर जीव सुखात असो वा दुःखात असो, 

मनात उद्वेग निर्माण झालेला असो की मन चिंतेने ग्रासलेले असो, आनंदसागरात मन डुंबत असो की दुःखभोवऱ्यात गटांगळ्या खात असो, स्वामींच्या | नामस्मरणाव्यतिरिक्त एक क्षणसुद्धा वाया दवडू नये. ह्याचा अर्थ असा की आयुष्यातला हर्षकाळ असो की जिवावर बेतलेला कठीण आणि असह्य काळ असो, प्रपंचातल्या अनंत कटकटीचा कालखंड असो, 

स्वामींच्या नामस्मरणात खंड पडता कामा नये. स्वामींच्या नामाला आपल्या प्रत्येक श्वासातून ओवणे | अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला एकच सांगतो, समर्थांचे सांगणे ह्या संदर्भात फार महत्त्वाचे आहे. 

नामस्मरणासंबंधी समर्थ म्हणतात की,
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये ॥ 

फार मोठे वैभव आणि प्रचंड सत्ता जरी प्राप्त झाली किंवा अठराविश्वे दारिद्रयाचा फटका बसला, अंगावर जरी काळ धावून आला तरी नामस्मरणाची आनंदस्थिती कधीही विस्कटू देऊ नये. सांगायचा मुद्दा असा की स्वामींचे नाम हाच मानवी आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यापुढे सर्व सुखे, वैभव, सत्ता फिकी पडते. दुःख दूर पळून जाते. म्हणून नामस्मरणातच आपण दंग व्हावे... श्री स्वामी समर्थ |

----------------------------------------

🌹Avdhut Chintan Shree Gurudev Datta🌹

❤️Anatakoti Brahmnda Nayaka Rajadhiraja Yogiraja Parabrahma Satchidananda Sadguru Akkalkot Niwasi Sadguru Shree Swami Samarth Mahara ki Jai..!❤️

❤️अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !❤️

🌹 श्री गुरुदेव दत्त | श्री गुरू स्वामी समर्थ 🌹

टिप्पण्या