03/12/2023 l नित्य स्वामी दर्शन l गुरू स्वामी समर्थ l Shree Guru swami samarth l Nitya swami darshan 03 Decembar 2023
03/12/2023 नित्य स्वामी दर्शन (गुरू स्वामी समर्थ)
🌹 श्री गुरुदेव दत्त | श्री गुरू स्वामी समर्थ 🌹
माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांनो, काल एक भक्त मला विचारू लागला की ज्यांना कीर्तन करणे जमत नाही त्यांनी काय करावे ... ज्यांना कीर्तनाचे अंग नाही त्यांना आणखी एक उत्तम मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वामींच्या भजनाचा... कीर्तन काय किंवा भजन काय, दोन्ही शेवटी एकच आहे.
भजनात जेव्हा स्वामीप्रेमाचा टिपेचा सूर लागतो, तेव्हा होणारा आनंद आपल्याला कशानेही मोजता येत नाही. भजनासाठी उत्तम गळा लागतो आणि स्वर नेमकेपणाने मांडता यावे लागतात. शब्दांचा नेमका उच्चार करता येणे महत्त्वाचे असते. कीर्तनाने काय किंवा भजनाने काय, वाणी पवित्र होते. माणूस | सत्पात्र होतो. ह्या कीर्तन आणि भजनामुळे सर्व स्वामीभक्त विलक्षण अशा शांतीचा आनंद उपभोगू | लागतात.
आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामींच्या सततच्या कीर्तनामुळे आणि भजनामुळे आपल्या जगत असलेल्या चारित्र्याला सुवर्णझळाळी प्राप्त होते. मन एकाग्र व्हायला शिकते. स्वामींच्या अस्तित्वाची 'चाहूल लागते. मन प्रसन्न होते. समर्थ म्हणतात, -
म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तने संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थे आणि जगदात्मा । कीर्तनी वसे ॥
कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाने स्वामींना खूप संतोष होतो. स्वामींच्या कीर्तनाने वाणी लख्ख तर होतेच, परंतु कीर्तनामध्ये सर्व तीर्थांचा आणि स्वामींचा प्रत्यक्ष निवास असतो ह्याची प्रचीती आपल्याला येते.
म्हणून स्वामींना कीर्तनभक्ती आवडते. स्वामी कीर्तन ऐकायला येतात ह्याची प्रचीती | आजपर्यंत अनेक कीर्तनकारांना आलेली आहे. स्वामींचे सगुण साकार वर्णन करीत असताना त्यांच्या | एक गोष्ट लक्षात येते की जे वर्णन चालले आहे ते रूप प्रत्यक्ष समोर बसलेले आहे. त्यामुळे काय होते की वर्णनाला बहर येतो. प्रत्यक्ष स्वामी कीर्तनात सहभागी झाल्यामुळे मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विलक्षण आनंद होतो. शब्दांना आपोआप सुगंध प्राप्त होतो. शब्द हृदयरूपात प्रकट होतात. ही सारी स्वामींची कृपा असते म्हणून ह्या दुसऱ्या पायरीला महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ
----------------------------------------
🌹Avdhut Chintan Shree Gurudev Datta🌹
❤️Anatakoti Brahmnda Nayaka Rajadhiraja Yogiraja Parabrahma Satchidananda Sadguru Akkalkot Niwasi Sadguru Shree Swami Samarth Mahara ki Jai..!❤️
❤️अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !❤️
🌹 श्री गुरुदेव दत्त | श्री गुरू स्वामी समर्थ 🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा