तुझ्या स्तुतीनेच जर आमचा उद्धार होणार असेल तर मग हि स्तुती करण्याचे का मनात येऊ नये ? म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांनो, स्वामींना पूर्णांशाने शरण जा.

म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांनो, स्वामींना पूर्णांशाने शरण जा. त्यांच्या चरणसेवेमध्ये रममाण व्हा. तरच स्वामीदर्शनाचा सोहळा सिद्ध होईल. स्वामीसाक्षात्काराचा मार्ग खुला होईल. तुम्हाला एक सांगतो की, वास्तविक | स्वामी समर्थ हे नेहमीच प्रकट अवस्थेत सिद्ध असतात; परंतु आपल्या मर्त्य डोळ्यांना ते कधीच दिसत नाहीत. त्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे. तो म्हणजे स्वामींची चरणसेवा. चरणसेवा ही भक्तांना स्वामींपर्यंत सहजपणे घेऊन जाते. स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन हवे असेल तर त्यांचा ध्यास घ्यावा लागतो.. त्यांच्या चरणसेवेत अष्टौप्रहर निमग्न व्हावे लागते. श्री स्वामी समर्थ । 

तुझ्या स्तुतीनेच जर आमचा उद्धार होणार असेल तर मग हि स्तुती करण्याचे का मनात येऊ नये ? केवळ नमस्कारानेच जर येरझार चुकणार असेल तर हात जोडण्याचे कष्ट देखील का घ्यावेसे वाटू नयेत ? स्मरण मात्रे जर तू सन्निध येणार असशील तर मग मनात तुझे स्मरण का होऊ नये ? हे देवा , पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध आहेत म्हणून तुझ्या भक्तीचा मार्ग मिळाला पण मग असे अर्ध्यावर का सोडतोस ? परीक्षा घेणे किंवा मनातील भावाला पारखणे हि तुझी नित्याची बाब असली तरी आम्ही काही त्याला पात्र नाही .

ऐहिकातील पदवी म्हणून मिळवलेल्या परीक्षेत आम्ही यशस्वी झालो असलो तरी तुझ्या परीक्षेत मात्र नेहेमीच नापास होतो .तू नेहेमीच न सुटणारी कोडी घालतोस आणि ती सोडवताना आयुष्य निघून जाते मात्र गुंता काही सुटत नाही . आमच्या मनात निस्सीम भाव नाही हेच खरे . अन्यथा तू असे कठोर मन केले नसतेस . दत्त महाराजा ,काहीही करून यातून सोडव ,अशा हाकेला नित्य धावून येणारा तू अशी तुझी प्रसिद्धी आहे ,भक्ताना मी ओलांडून जात नाही हे तुझे वचन आहे पण मग माझ्या बाबतीतच हे सर्व का असत्य होते ?

स्वप्नात नाना परीने अनेकांना दृष्टांत देतोस ,अनेकांचे आयुष्य अनुभूतीने समृद्ध करतोस मात्र मला काहीच कसा अनुभव येत नाही ? तू जवळ आहेस पण मग तुझे  सोबत असणे जाणवत का नाही ? कि मला तू अद्याप पात्र समजत नाहीस ? तुझ्या क्षेत्री निवास ,त्यातही तुझी सेवा आणि त्यातही सेवा मान्य होत  कृपा हे एकाहून एक दुर्लभ आहे -- तुझ्या क्षेत्री निवास जरी तू देणार नसलास तरी कधी कधी राजधानीत बोलावत तरी जा . इतका का दूर लोटतोस ? कि मी त्यालाही अपात्र आहे .

अशा तुझ्या दूर लोटण्याने आम्ही फार निराश होतो आणि मनात भावना अशी येते कि आमच्या इतका महापातकी अन्य कोणी नाही . संस्कृत भाषेला आम्ही आमच्या परीक्षेतील गुणतक्ता सुधारण्यासाठीच घेतले होते त्यामुळे तुझी स्तोत्रे किंवा अन्य स्तुती आम्हाला कळत नाही मात्र आमच्या मनातील भावाला समजून आमच्यावर कृपा कर . तूच दिलेल्या  वैभवातील अल्प स्वल्प दान करताना मनात आलेला अहंकार नाहीसा कर आणि दिवसात एकदा तरी तुझी आठवण होत हात जोडले जावेत हि प्रार्थना !

 पादसेवनभक्ती ही नवविधाभक्तीची चौथी भक्तिपायरी. स्वामी समर्थांची प्राप्ती होण्यासाठी आपण | कायावाचामने आणि अत्यंत श्रद्धेने स्वामींची चरणसेवा करावी. स्वामींच्या चरणसेवेमुळे मोक्षाचा मार्ग |लख्ख दिसू लागतो. हीच ती पादसेवनभक्ती. एक लक्षात घ्या की, अनन्यभावनेने स्वामींची अष्टौप्रहर सेवा केल्याशिवाय, त्यांच्या चरणांची पूजा केल्याशिवाय स्वामींच्या कृपेची खरी बरसात होतच नाही. स्वामींची कृपा झाल्याशिवाय हा दुस्तर भवसागर पारच करता येत नाही.

म्हणून माझ्या प्रिय स्वामीभक्तांनो, स्वामींची पादसेवनसेवा जेवढी जमेल तेवढी करा. एकदा का स्वामींच्या चरणसेवेत आपण आत्ममग्न झालो की स्वामींची आपल्यावर अप्रतिम कृपा होते. हा आत्मानुभव प्रत्येक स्वामीभक्तांने घ्यायला हवा. स्वामी आपल्या अस्तित्वाचा खरे तर कायापालट करून टाकतात. दिसणारे | आणि प्रत्यक्षात भासणारे हे सुंदर जग म्हणजे स्वामींची माया आहे आणि स्वामीच फक्त सत्य नि शाश्वत आहेत ह्याची जाणीव स्वामीकृपा झाल्याशिवाय होत नाही.

आणखी एक सांगतो की, मनाने निःसंग झाल्याशिवाय भक्तीच्या ह्या पहिल्या चार पायऱ्या चढून जाताच येत नाहीत. कारण साधकाची जर देहबुद्धी शिल्लक राहिली तर मला सांगा, पादसेवनसेवा तो कशी काय करणार... त्याचा देहव्यापी 'मी' त्याच्या एकूणच अस्तित्वावर मात करत असतो. देहभाषा संपल्याशिवाय माझे स्वामीविचार तुमचे | मन काबीज करू शकणार नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर मी एवढेच म्हणेन की, अहंकाराचा त्याग केल्याशिवाय स्वामींचा प्रत्यक्षातला सहवास कधीच लाभत नाही.

-----------------------------------------

🌹Avdhut Chintan Shree Gurudev Datta🌹

❤️Anatakoti Brahmnda Nayaka Rajadhiraja Yogiraja Parabrahma Satchidananda Sadguru Akkalkot Niwasi Sadguru Shree Swami Samarth Mahara ki Jai..!❤️

❤️अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !❤️

🌹 श्री गुरुदेव दत्त | श्री गुरू स्वामी समर्थ 🌹

टिप्पण्या